मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी कुणा-कुणाला आला फोन?
schedule09 Jun 24 person by visibility 128 categoryलोकसभा निवडणुक

दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये झालेल्या NDA च्या विजयानंतर आज नरेद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. स्थापन होत असलेल्या या नव्या सरकारच्या अर्थात मोदी ३.० च्या कॅबिनेटमध्ये मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी नेते मंडळींना फोनही यायला सुरुवात झाली आहे.या पार्श्वभूमीवर अतापर्यंत अनेक नेत्यांना फोन आल्याचे समजते.
फोन आलेल्या नेत्यांमध्ये राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, नितिन गडकरी यांच्यासह JDU नेते तथा राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर, अपना दल (एस) च्या नेत्या अनुप्रिया पटेल, लोजपा राम विलास पासवान अध्यक्ष चिराग पासवान , हम प्रमुख जीतन राम मांझी, रालोद प्रमुख जयंत चौधरी , तसेच टीडीपी खासदार राम नायडू आदींना फोन आले आहेत.