Maha Hit 24
Register

जाहिरात

 

मा. आमदार डॉ सुजित मिणचेकर यांच्याकडून रुईतील पूरबाधित भागांची पाहणी

schedule28 Jul 24 person by visibility 122 categoryसामाजिक


कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)

कोल्हापूर: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महापुराने विळखा घातलेला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा व पंचनामा नदीने रुद्रावतार धारण केल्याने नदी परिसरातील अनेक लहान मोठ्या गावांना पुराचा फटका बसलेला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना सरकारकडून मदतीची अपेक्षा लागून राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पूरग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले ते रुई ता. हातकणंगले येथील पूर परिस्थितीची पाहणी दरम्यान बोलत होते.

दरम्यान महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा रुईच्या वतीने पूरग्रस्तांच्या अन्नछत्रास एक वेळचे जेवण देण्यात आले. त्यास भेटही दिली. 

यावेळी सरपंच करिश्मा मुजावर, उपसरपंच युनूस मकानदार, सदस्य अवधूत कुलकर्णी, अभय काश्मिरे, राजू बेनाडे, गौतम उपाध्ये, सुभाष चौगुले, कुमार खुळ अशोक आदमाने, संजय चौगुले, शाखाप्रमुख अविनाश शिंदे, भाऊसाहेब फास्के, राजाराम झपाटे सर, महेश पोलसे, संजय आबदान, अरुण आवटे, मारुती पुजारी, अमोल आवटे, सुनील वडगावे ,महादेव अपराध, विष्णू सावंत, कुमार खुळ अनिल साठे, आनंदा झपाटे, चंद्रकांत झपाटे, स्वप्निल सरोदे, आनंदा किलेदार, दिलावर नदाफ, ओंकार किल्लेदार, सचिन माने, अतुल शिंदे, किसन साठे, अभय आबदान , प्रतीक धड्डे, दिलावर नदाफ, सागर मुरचिट्टे,वसंत बेनाडे शिवराज पाटणकर,जावेद मुजावर सागर कमलाकर यांच्यासह अन्य मान्यवर वा पत्रकार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes