महाराष्ट्रातील कुठल्याही पोलिसांना त्रास झाला तर....
schedule19 Nov 24 person by visibility 90 categoryविधानसभा

कोल्हापूर: राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते जोमाने कार्यरत असून या सर्व वातावरणामध्ये कायदा आणि सूवस्थेचे चोख नियोजन राखले जावे यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे या पोलिसांना जर कोणत्या कार्यकर्त्यांनी , समाजकंटकांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पोलिसांना टारगेट केले किंवा पोलिसांना त्रास झाला तर त्यांना उचलून आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले यांच्याकडून देण्यात आला आहे.
मागच्या लोकसभा इलेक्शन पासून पोलीस अधिकारी कर्मचारी घरी घरी न जाता अहोरात्र राबत आहेत. नेत्यांचा पाठिंबा फक्त २० तारखेपर्यंतच असून 21 तारखेपासून महाराष्ट्र पोलीस पुन्हा खंबीर उभा आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष तसेच शाखाध्यक्षांना आपापल्या गावात शहरात बुथवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेसाठी उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पोलिसांना त्रास देता आले व्हिडिओ आणि फोटो काढून पाठवण्याची विनंती ही राहुल दुबाले यांच्याकडून करण्यात आली. तसेच तरुणांना राजकारण्यांचं ऐकून आयुष्याचा वाटोळ न करता आपला सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे काळजी घेण्याचे आवाहनही राहुल दुबाले यांच्याकडून करण्यात आले.
राहुल अर्जुनराव दुबाले
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
98 22 66 82 52