गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
schedule28 Nov 24 person by visibility 104 categoryटेक्नॉलॉजी
गाडी घेण्याचा विचार करताय का? कन्फ्यूज आहात का? चिंता करू नका, कारण आज आम्ही तुमच्यासाठी एक खास पर्याय घेऊन आलो आहोत. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडिया लिमिटेडने भारतात Honda Activa Electric Scooter चे व्हर्जन लॉन्च केले आहे. चला, यामध्ये काय खास आहे, ते जाणून घेऊया.
होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटरसोबत स्वॅपेबल बॅटरी दिली जाईल, ज्यामुळे तुमचं रेंज आणि चार्जिंग अनुभव सोप्पं होईल. या स्कूटरची बुकिंग 1 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. त्याचबरोबर, कंपनीने क्यूसी 1 नावाची आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे, ज्यात फिक्स्ड बॅटरी असेल.
होंडा अॅक्टिव्हा ईव्ही स्टँडर्ड आणि RoadSync Du हे दोन व्हेरियंट्समध्ये येईल.
- स्टँडर्ड व्हेरियंटचे वजन 118 किलो असून, यात 5 इंचाची टीएफटी स्क्रीन आणि मर्यादित ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असतील.
- RoadSync Du व्हेरियंटमध्ये 7 इंचाचा डॅशबोर्ड असेल, जो टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि नोटिफिकेशन अलर्ट देईल.
दोन्ही व्हेरियंट्स विविध फिचर्स आणि डिस्प्लेसह येत आहेत, जे तुम्हाला अधिक स्मार्ट आणि आरामदायक राईड अनुभव देतील.