शिक्षक भरती संदर्भात महत्वाची माहिती
schedule02 Mar 24 person by visibility 202 categoryनोकरी
पुणे: राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असून निवड समितीतर्फे समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी पूर्वतयारी केली जात आहे.
त्याबाबत सुध्दा प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
त्यामुळे पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे.
जास्तीत जास्त उमेदवार मुलाखतीशिवायच्या भरतीच्या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर मुलाखतीच्या भरती प्रक्रिये संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.