अंदर बाहर जुगार अड्ड्यावर छापा
schedule26 Oct 24 person by visibility 173 categoryगुन्हे
चंदगड: तालुक्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून शिनोळी खुर्द येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. यावेळी 58 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सहा लाख 78 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध्य व्यवसायांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे . त्या अनुषंगाने तपास चालू असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार शिनोळी खुर्द येथील सर्फराज निसार ताशीलद्वार याच्या मालकीच्या इमारतीत अंदर बाहर नावाचा पत्त्यांचा जुगार खेळ सुरू आहे. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी छापा टाकण्यात आला.
या कारवाईत जुगार चालक तसेच तिथे काम करणारे कामगार आणि जुगार खेळणारे 51 जणांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम 55 मोबाईल हँडसेट आणि जुगार खेळाचे साहित्य असे एकूण सहा लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीं विरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलद्वार दिपक घोरपडे, रामचंद कोळी, समीर कांबळे, राजू कांबळे, सतिश जंगम, वसंत पिंगळे, महेश आंबी, सागर चौगले व यावंत कुंभार यांच्याकडून करण्यात आली.