खासदार मा.धैर्यशील माने यांच्याकडून जुने पारगावतील पुरग्रस्त परिस्थिती पाहणी
schedule29 Jul 24 person by visibility 232 categoryसामाजिक

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि वारणा धरणातील विसर्गामुळे वारणा नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला आहे.
या पार्श्वभूमीवर आज नूतन खासदार मा.धैर्यशील माने यांनी जुने पारगावला भेट दिली. यावेळी संपुर्ण गावाची पाहणी करून बाधित ठिकाणांना भेट दिली व नुकसानीचा अंदाज घेतला. जीवित व वित्तहानी टाळणेसाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून स्थलांतरित होण्याची विनंती केली. तसेच प्रशासनाने पूरग्रस्तांना सोयी सुविधा पुरविण्याच्या सुचना केल्या.
सदर भेटीवेळी आमचे नेते श्री.प्रदिप देशमुख (संचालक-वारणा दुध संघ), श्री.प्रकाश देशमुख (मा.लोकनियुक्त सरपंच), श्री.राजवर्धन मोहिते (संचालक-वारणा दुध संघ), श्री.बाबासो मोरे (चेअरमन-श्री पाराशर विकास सेवा सो.), श्री.तुकाराम पोवार (लोकनियुक्त सरपंच) व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.