Maha Hit 24
Register

जाहिरात

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आंतरराज्य सीमा समन्वय बैठक

schedule15 Nov 24 person by visibility 54 categoryकोल्हापूर

कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली  कर्नाटक राज्यासोबत सीमा समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आंतरराज्य तपासणी नाके, घटकातील प्रलंबित अजामीन वॉरंट, भेटवस्तू साठा व वाटप, अवैद्य रोग रक्कम वाहतूक व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती आदींची माहितीची  सीमेलगत असणाऱ्या कर्नाटक राज्यातील जिल्हा घटकांसोबत देवाण-घेवाण करण्यात आली.

बैठकीत  आंतरराज्य सीमा तपासणी नाके कामगिरीचा आढावा घेण्यात आला. अजामीनपात्र वॉरंट, पाहीजे फरारी आरोपी, सीमा भागातील गुन्हेगारी टोळया व गुन्हेगार यांची माहिती एकमेकांना प्रदान करणे. अजामीनपात्र वॉरंट बजावणीस प्राधान्य देणे ज्यामुळे निवडणुक कालावधीत गुन्हेगारी पार्श्वभुमी असणाऱ्या गुन्हेगारांवर निबंध ठेवता येतील. कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील पोलीस ठाणे स्तर व उपविभाग स्तरावर सीमा समन्वय भेटी व बैठका घेवून पोलीस ठाणे व उपविभाग यांचे कडील गोपनिय माहितीचे आदान प्रदान करणे. अवैध शस्त्र, रोख रक्कम, मद्यसाठा, गुटखा व अंमली पदार्थ यांची वाहतुक व साठा याबाबतची Real time माहिती दोन्ही बाजूंकडून एकमेकांना पुरविणे. मतदानाच्या ७२ तासापुर्वी सीमावर्ती भागातील पोरस (Porous) पॉईंट सील करणे, मतदान व मतमोजानी दिवशी कर्नाटक भागातील सीमावर्ती जिल्ह्यातील मद्य कोरडा दिवस घोषित करण्याचे, आगामी काळात सीमा तपासणी नाक्यांवर अधिक लक्ष केंद्रित करुन अवैध गांजा, दारु, पैसे, Freebies (भेटवस्तु) यांचे वर प्रभावी करवाई करणेबाबत अधिक भर देणे इत्यादि बाबींवर चर्चा व कृतीआराखडा सह ठोस कार्यवाही बाबत चर्चा करण्यात आली. यासाठी दोन्ही राज्यांचे उत्पादन शुल्क विभाग, वस्तु व सेवाकर विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग व वनविभाग इत्यादि खात्यांची मदत घेण्यात येणार आहे.

यावेळी  बेळगावी परिक्षेत्रचे पोलीस महानिरीक्षक विकास कुमार विकास. पोलीस आयुक्त, मार्टीन. पोलीस उपमहानिरीक्षक, कलबुर्गी अजय कुमार हिलोरे, पोलीस अधीक्षक, डॉ. भिमाशंकर गुळदे, पोलीस अधीक्षक, विजयापूर प्रसंन्न देसाई, पोलीस अधीक्षक, बिदर  प्रदिप गुट्टी, पोलीस अधीक्षक, कलबुर्गी  अद्दरु   निवासलू, कोल्हापूर पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक, सांगली श्रीमती रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री देसाई, आदी. उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes