Maha Hit 24
Register

जाहिरात

 

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय योगदिन

schedule18 Aug 24 person by visibility 82 categoryआरोग्य


आंतरराष्ट्रीय योगदिन-२१ जून २०२३:- (अमेरिकेतील). 

सौ. शैलजा धामणकर-निंबाळकर, B.Sc, B.Ed., 10, शिरगांवकर कॉलनी, राधानगरी रोड, कोल्हापूर मो.नं. ९५५२५२९६४७ , 9552529647.

भारताच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी, "योगविद्या' हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ही योगाची परंपरा, हजारों वर्षापासून, अनेक ऋषिमुनींकडून आजतागायत भारतात चालत आलेली, अत्यंत प्राचीन अशी आहे. जी, जीवन कसे जगावे हे

सांगणारी आहे. आपले मा. पंतप्रधान मोदीजींनी याचे महत्व जाणून, योगविद्येला आ तरराष्ट्रीय स्तरावर नेऊन, तिचे महत्व संपूर्ण जगामध्ये अधोरेखित केले आहे. आणि त्यांच्याच प्रेरणेने, पुढाकाराने २१ जून हा आतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली २०२३ या वर्षीचा २१ जून हा श्वा आंतरराष्ट्रीय योगदिन- खास आहे. कारण, मोदीजींनी, पर्यायाने भारताने 'वसुधैव कुटुंबकम्' ही संकल्पना डोळ्य सिमोर ठेऊन, संपूर्ण जगाला एकत्र आणून हा योगदिन साजरा करण्याची योजना मांडली आणि ती अख्ख्या जगाने उचलून धरली. आणि अमेरिकेने हा आंतरराष्ट्रीय योगदिन मोदीजींच्या नेत्रुत्वाखाली साजरा करण्यासाठी, त्यांना मोठ्या सन्मानाने निमंत्रीत केले. भारताची भूमिका "One Earth, ONE Family, One CULTURE ही असून, विश्रव बंधुत्व निर्माण व्हावे, आपसातील मतभेद, वैरभाव दूर होऊन, बंधुभाव, प्रेम निर्माण होऊन तो बुद्धिंगत व्हावा मानवतेला प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. अशा या उदात्त हेतूनेच अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या मुख्यालयाच्या प्रांगणात हिरवळीवर या आ तरराष्ट्रीय योगशिबिराचे आयोजन करण्यात आले. आजच्या आधुनिक युगात विद्यान, तंत्रद्‌यानाने प्रचंड मोठी झेप घेतली हे जरी खरे असले तरीही आज घडीला, या धकाधकीच्या
जीवनात संपूर्ण जग हे, दहशतवाद, शांतता, मानसिक अस्थैर्य, टोकाची जीवघेणी स्पर्धा, द्वेष, प्रचंड दडपण अशा भितीच्या सावटाखाली वावरत आहे. मोदीजी आपल्या भाषणात जगाला संबोधित करतांना म्हणतात 'या सार्यातून बाहेर पडण्यासाठी योगविद्येचा अभ्यास हाच रामबाण उपाय आहे. म्हणून योगाची कास धरा. तीच आपली जीवनशैली बनवा आणि आपले आयुष्य सुखी बनवा. हा संदेश हेच या योग शिबिराचे प्रम ख उद्दिष्ट आहे. या योगदिनी, जेव्हां मोदीजींचे आगमन झाले तेव्हा, वाटतो असेही त्यानी कोतुकानी, आवर्जून सांगितले.

U.N. चे जनरल असेंब्लीचे अध्यक्ष श्री. कोरोसी, भारताचे U.N मधील प्रतिनिधी रुचिरा कंभोज, न्यूयॉर्कचे मेयर श्री. एरीक अॅडम्स यांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि आपण या सोहळ्याचा एक भाग आहोत, याचा त्यांना सार्थ अभिमान.

या शिबिरात योगाभ्यासाला सुरुवात करण्यासाठी मोदीजी सर्वाच्यामध्ये जाऊन बसले आणि शिबिराचा प्रार भ, सुरेल आवाजात, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः " या श्लोकाने झाला. संपूर्ण शांतता पसरली. या कार्यक्रमासाठी अगदी ८५ वर्षांच्या ज्येष्ठांपासून ते शाळकरी मुलांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग होता. संपूर्ण जगातून लोक आले होते. १३५ देश सहभागी झाले होते. शिबिरात संपूर्ण जग मोदीजींसोबत ओंकार-प्रणवोच्चार करत होते. अत्यंत अविस्मरणीय, अभिमानास्पद आणि हृद्य असा हा क्षण होता. न भूतो न भविष्यति असा. यानंतर मोदीजी आपल्या भाषणात जगाला संबोधित करतांना म्हणतात- 'आज आपल्या सर्वांना योगाने एकत्र आणले, योगाची महति अशी आहे की, तो सर्वांप्रती प्रेम, दयाळूपणा, एकता, विश्वास शिकवितो. सलोखा निर्माण करतो. मानसिक शांतता देतो. भावनिक, बौदिधक, मानसिक, शारिरीक संतुलन मिळवून देतो. तो कोणत्याही एकाच धर्मासठी पंथासाठी, जातीसाठी नाही. धर्म प्रसारासाठीही नाही. तो सर्वांसाठी आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थय मिळवून देणारा आहे. मग हे कोणाला नको आहे बरं? ते तर सर्वांनाच हवे आहे हो ना? शिवाय योग हा FLEXIBLE आहे. तो घरी करा, बाहेर करा, वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. फक्त अट एकच. पोट रिकामे असतांना करा योगाचे एवढे सारे फायदे आहेत म्हणून नित्य, निरंतर योग करा. त्यात सातत्य ठेवा. योगाभ्यास आपल्या द नंदिन जीवनशैलीचा एक भाग होऊ द्या. म्हणजे आपले जीवन आनंदी, सुखमयी होऊन जाईल. योगसाधना झाल्यानंतर, मोदीजीनी या कार्यक्रमासाठी विविध देशातून आलेल्या छोट्या बाल दोस्तांशी हस्तांदोलन करत त्यंच्याशी गप्पा मारल्या. सगळी बच्चे कंपनी जाम खूश झाली. विशेष म्हणजे लौकर उठून ती सर्व आली होती. सर्वांसाठी नाश्ताही तयार होता. नाश्त्यासाठी यावर्षी असलेल्या 'मिलेट डे'चे औचित्य साधून ज्वारी, बाजरी, राळ अशा त्रुण धान्यांपासून नाश्ता बनविलेला होता. तर दुसरीकडे

एक ऑस्ट्रेलियन नागरिक आणि अॅक्टर रिचर्ड जेरे, सिंगर फाल्गुनी शहा, मेरी मिलबेन, कंपोजर रिकी केज म्हणतात-"-It is a proud moment for the whole world, Very amazing" तर अमेरिकास्थित भारतीय म्हणाले "बहोत बढ़िया, हम बहोत खूश है,, सार्या जगात मोदीजींनी आपल्या भारताची शान वाढविली. सर ऊँचा कर दिया. न्यू यॉर्क को Excite कर दिया. WE are very proud of our Modiji and India.we love Modi. लांबून आलेला २८ वर्षाचा तरूण म्हणतो आम्हाला जेट लेंग आहे पण एवढा मोठा प्रवास करून मोदीजी आले, तरीही पुन्हा नव्या जोमाने, उत्साहाने हजर झाले. खरंच आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो. IT IS A great Event and MOMENT FOR India and also for the whole world. SIMPLY AMAZING. No words. सगळीकडे" मोदी मोदी, We love Modi. मोदी है तो हम है-सब मुमकिन है "चा नारा चालू होता. अशा रितीने हा भव्य दिव्य सोहळा-Mega Event अत्यंत उत्साहात, दिमाखदारपणे संपन्न झाला. असा हा, बुधवार दि, २१ जून २०२३रोजी, अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात साजरा झालेला आंतर राष्ट्रीय योग दिन- ज्यामध्ये संपूर्ण जगातील १३५ देश, जेकाच वेळी एकत्र आले होते, तेही मानवतेसाठी, संपूर्ण जगातील दहशतवाद, भिती दूर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी, एकता, विश्वबंधुत्व निर्माण होण्यासाठी. तर अशा या जागतिक सोहळ्याची संकल्पना भारताने मांडली आणि ती प्रत्यक्षत साकारली गेली. या ऐतिहासिक क्ष णाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. "केवढा हा आनंदाचा सोनेरी क्षण. जो फक्त आपल्या भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अभिमानाचा ठरला.. निव्वळ अवर्णनीय, शब्दातीत. असा कधी झाला नाही कधी होणे नाही.

हरिः ओम्

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes