सेवा रुग्णालयात कंत्राटी तत्वावरील पद भरती अर्ज करण्याचे आवाहन
schedule10 Jul 24 person by visibility 100 categoryलाइफस्टाइल

कोल्हापूर: कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत निव्वळ कंत्राटी तत्वावर 11 महिने कालावधीकरिता रिक्त पदांच्या भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदांच्या अनुषंगाने अटी व शर्ती सेवा रुग्णालयातील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. पात्र उमेदवारांनी सेवा रुग्णालयाच्या जाहिरातीनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज वैद्यकीय अधिक्षक सेवा रुग्णालय कोल्हापूर कार्यालयात 18 जुलै 2024 अखेर कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावेत, असे आवाहन सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलीमा पाटील यांनी केले आहे.