जीव झाला येडापिसा’ फेम विदुला चौगुले बोल्ड फोटोशूटमुळे ट्रोल
schedule30 Nov 24 person by visibility 149 categoryमनोरंजन

मुंबई : मराठी अभिनेत्री विदुला चौगुलेने व्हिएतनाममधील समुद्रकिनारी केलेल्या बोल्ड बिकिनी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विदुलाने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
विदुलाच्या लाल बिकिनीतील या फोटोंना काही चाहत्यांनी पसंती दिली असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. मात्र, दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेचा भडिमार केला आहे. काहींनी तिला "मराठी संस्कृतीचा अपमान करणारी" म्हणत संताप व्यक्त केला आहे.काही नेटकऱ्यांनी "काम मिळवण्यासाठी मराठी संस्कृती पायदळी तुडवली" अशा कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत. या ट्रोलिंगमुळे विदुलावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत.