Maha Hit 24
Register

जाहिरात

 

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 'या' पदांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

schedule10 Jun 24 person by visibility 81 categoryनोकरी

कोल्हापूर : हातकणंगले व चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी प्रत्येकी एक सफाई कामगार व परिचर कामे करण्यास इच्छुक बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ही कामे करण्यास इच्छुक तालुक्यातील , कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाकडे नोंदणीकृत सांगली, सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या कार्यरत तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्रासह दिनांक 12 जून 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत 1 सफाई कामगार 11 महिन्यांच्या कालावधीसाठी 7 हजार 219 रुपये मानधनवार (सुट्टीचे दिवस वगळून). जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर कार्यालयामार्फत 2 परिचर 11 महिन्यांच्या कालावधीसाठी 10 हजार 416 रुपये प्रति कर्मचारी (सुट्टीचे दिवस वगळून) मानधनावर व सहायक आयुक्त,कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता कार्यालयामार्फत एक सफाई कामगार 11 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिदिन रुपये 194.25 रुपये (सुट्टीचे दिवस वगळून) मानधनावर ठेवण्यात येणार आहेत.

 अटी व शर्ती -

बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटींची स्थापना ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस रुपये 3 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव, दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमित वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2021-22, 2022-23, 2023-24 च्या लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. 

सहकारी सेवा सोसायटी/लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्र देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे सहकारी सेवा सोसायटीतून कमी करुन त्याठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकित प्रती, प्रमाणपत्र मूळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. हे काम हातकणंगले, चंदगड तालुक्यातील असल्याने तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्यांनी या कार्यालयाकडे नोंदणीकृत कार्यरत संस्थांनी अर्ज, प्रस्ताव सादर करावेत. अर्ज, प्रस्तावासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकीत प्रत जोडावी. संस्था अवसायानात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करु नये.

वरील अटी पूर्ण करणा-या कार्यरत सेवा सहकारी संस्थानी आपल्या इच्छापत्रासह प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 12 जून 2024 पर्यंत कौशल्य विकास कार्यालयास सादर करावेत, असेही श्री. माळी यांनी कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes