मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणे पडले महागात
schedule25 Oct 24 person by visibility 128 categoryगुन्हे
अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कायदा वस्तूव्यवस्था याचे रक्षण होण्यासाठी तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने बेकायदेशीर हत्यार बाळगणे तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर तपास सुरू असता शाहुवाडी तालुक्यातील उत्तम मारुती कांबळे व प्रवीण दौलत लोखंडे या तरुणांना मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवून समाजात दहशत निर्माण करणे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तीन तलवारी व यामा मोटरसायकल असा एक लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शाहुवाडी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सागर चौगुले, सुरेश पाटील, रुपेश माने, अमित सर्जे, अशोक पवार, युवराज पाटील, महेश पाटील, प्रदीप पाटील, विनोद कांबळे व हंबीर अतिग्रे यांच्याकडून करण्यात आली.