आत्महत्या भासवत खून करून झाडाला लटकवले.....
schedule24 Oct 24 person by visibility 127 categoryगुन्हे
कोल्हापूर : कागल येथील एकोडी गावात अनैतिक प्रेम संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकरा सोबत पतीचा काटा काढण्यासाठी आत्महत्या भासवत खून केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी विजय संभाजी खोत याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर मयत सूर्यकांत खोत यांच्या पत्नीला निर्दोष मुक्त करण्यात आली आहे.
सदरची घटना कागल पोलीस ठाणे हद्दीतील एकोंडी येथे 23 सप्टेंबर 2018 रोजी घडली. मयत सूर्यकांत खोत यांची पत्नी आणि आरोपी विजय खोत यांचे अनैतिक संबंध होते. हे निदर्शनास आल्यामुळे सूर्यकांत यांचे चिडचिड वाढल्याने ते दारूच्या आहारी गेले होते. दरम्यान सूर्यकांत खोत यांनी नदी किनाऱ्यावर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. पण तपासांती आरोपी विजय विजयने आणि मयत सूर्यकांत यांच्या पत्नीच्या संगणमताने सूर्यकांत यांचा खून करून त्यांना झाडाला लटकवल्याचे निष्पन्न झाले. सरकारी वकील एडवोकेट अमृता पाटोळे यांनी केलेल्या युक्तिवाद आणि साक्षीदार पुराव्यांच्या आधारे कोल्हापूर उच्च न्यायालयाकडून आरोपी विजय खोत या जन्मठेपेची शिक्षा तर मयत सूर्यकांत खोत यांच्या पत्नीची निर्दोष मुक्तता करण्यात आली