प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर कोल्हापूर मनपा कडून कारवाईचा बडगा
schedule05 Jul 24 person by visibility 98 categoryगुन्हे
कोल्हापूर: जिल्ह्यात 1 जुलैपासून प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्लास्टिक बंदीचे नियम मोडून प्लास्टिक विक्री करणाऱ्या कोल्हापुरातील दुकानांवर दंडात्मक कारवाई करताना कोल्हापूर महानगरपालिकेने कडक पावले उचलली आहेत.
सहाय्यक आयुक्त कृष्णन पाटील आणि मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील सर्व आरोग्य निरीक्षक, मुकादम, आणि कर्मचारी यांच्याकडून दि. ५ जुलै रोजी लक्ष्मीपुरी परिसरातील प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये बेकायदेशीर विक्री करताना आढळलेल्या दुकानांमधून 500 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच संबंधित श्री दत्त ट्रेडर्स ( शिवप्रसाद कोरे), साई एजन्सी (सुशील भोसले), तसेच निरंकारी स्टोअर (रमेश नरसिंगानी) या यांच्यावर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण 15,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
राज्यासह देशभरात 1 जुलैपासून 'सिंगल यूज प्लास्टिक' वर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला येत आहे.