कोल्हापूर उत्तरच उत्तर राजेश क्षीरसागर
schedule23 Nov 24 person by visibility 235 categoryराजकीय

कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज, 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून विजयी उमेदवारांकडून गुलाल उधळण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दमदार विजय मिळवत महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव केला आहे.
राजेश क्षीरसागर हे विजयाच्या उंबरठ्यावर असताना, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. विजयाची खुशी व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, गुलाल उधळत आणि नारेबाजी करत आहेत.
राजेश क्षीरसागर यांचा हा विजय शिंदे गटासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या विजयामुळे शिंदे गटाच्या राजकीय प्रभावात वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.