Maha Hit 24
Register

जाहिरात

 

कोल्हापूर श्रावण सुंदरी.....

schedule07 Aug 24 person by visibility 256 categoryखेळ


कोल्हापूर; सौंदर्य आणि बुद्धीच्या अविष्काराचा साक्षात्कार घडवणारी खास महिलांसाठी प्रथमच विजय माला फाउंडेशन घेऊन येत आहे श्रावण सोहळा स्पर्धा. या स्पर्धे अंतर्गत 24 वर्षाच्या पुढील महिलांसाठी मिसेस कोल्हापूर श्रावण सुंदरी, आणि अठरा वर्षापासून पुढील वयोग गटातील मुलींसाठी मिस कोल्हापूर श्रावण सुंदरी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर स्पर्धा शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी होणार असून या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी ट्रॉफी, क्राऊन, सर्टिफिकेट आणि बक्षीस तसेच प्रत्येक स्पर्धकाला सर्टिफिकेट आणि हमखास बक्षीस, त्याचबरोबर विजेत्या स्पर्धकांना ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार असल्याची माहिती विजय माला फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रियांका साळोखे यांनी दिली आहे.

या स्पर्धेसाठी प्रवेश फी पाचशे रुपये असून पहिल्या 10 स्पर्धकांना प्रवेश फी दोनशे रुपये असणार आहे. तर लवकरच आपलं नामांकन फायनल करा. असे आवाहनही विजयमाला फाउंडेशन कडून करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes