Maha Hit 24
Register

जाहिरात

 

बेकायदेशीर हत्यारे खरेदी-विक्रीच्या दोन घटनांनी कोल्हापुरात खळबळ

schedule18 Oct 24 person by visibility 51 categoryगुन्हे

कोल्हापूर : सध्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. तसेच निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचे पालन होण्यासाठी बेकायदेशीर हत्यार खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार तपास चालू असताना कोल्हापुरात घडलेल्या दोन घटनांनी खळबळ उडाली आहे. 

पन्हाळा तालुक्यातील येवलुज येथे अक्षय मिसाळ व स्वप्नील जाधव यांनी मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवून समाजात दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले समोर आले. अधिक तपास करत अक्षय आणि स्वप्नीलला ताब्यात घेत त्यांच्याकडून मोटर सायकल, तलवार असा एकूण 52 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

तर दुसऱ्या घटनेत करवीर तालुक्यातील खुपिरे गावात कृष्णा सुरेश कलकुटकी याच्याकडे असलेले बेकायदेशीर पिस्टल व राऊंड विक्रीसाठी आणण्याची माहिती पोलिसांना मिळाली. असता पोलीस पथकाकडून दोनवडे - साबळेवाडी फाटा येथील वीट भट्टी जवळ सापळा रचत कलकुटकी यांना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत राऊंड व एक्टिवा मोपेड असा एकूण एक लाख 51 हजार रुपये किमतीचा मध्यमान जप्त करण्यात आलाय.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes