उद्योजिका श्वेता पाटील यांना महाराष्ट्रातची रणरागिणी अवॉर्ड
schedule24 Feb 24 person by visibility 106 categoryरणरागिणी पुरस्कार
कोल्हापूर : कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी उद्योजिका म्हणून अगदी अल्फावधीत नावरुपास आलेल्या श्वेता राहुल पाटील यांना यंदाचा महाराष्ट्रातची रणरागिणी अॅवॉर्ड २०२४ जाहीर झाला आहे. यशराज प्रोडक्शनच्या वतीने दिनांक ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक राजेश्वरी मोटे आणि ज्योती पाटील यांनी दिलीयं.
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वत:च्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या, स्वत:चा नावलौकिक मिळवून समाजासाठी आरसा ठरलेल्या कर्तृत्वान युवती व महिलांचा महाराष्ट्रातची रणरागिणी अॅवॉर्ड ने सन्मान केला जातो.
यंदाही ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन सभागृहामध्ये या महागौरव सोहळ्याचं आयोजन केलं आहे. दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या युवती व महिलांचा सन्मान केला जाणार आहे. कोल्हापूरातील चिंचवाड येथील श्वेता राहुल पाटील यांनी सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात चांगलाचं नावलौकीक मिळवला आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात श्वेता पाटील यांनी चांगली ओळख निर्माण केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन त्या करीत असतात. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपनासह विविध सामाजिक उपक्रमामध्ये त्या सहभागी असतात. गतवर्षी आई ,मुलगी प्रमाणे सासू सुनेचे देखील नाते घट्ट आणि प्रेमळ होऊन त्यांच्यामध्ये एकोपा व जिव्हाळा निर्माण व्हावा या उद्देशाने दिनांक ८ मार्च २०२३ रोजी सुनांनी केलं सासवांचे पाद्यपुजन असा आगळा वेगळा औक्षण करून पाद पूजन करण्याचा कार्यक्रम गावामध्ये साजरा केला. कुंकूमार्चन मध्ये ही सहभागी होवून चिंचवाड पंचक्रोशीमध्ये त्यांनी महिलांची एकजुट बांधून मैत्री वाढवली आहे. सामाजिक कार्याबरोबरचं त्यांनी उद्योगक्षेत्रातही भरारी घेतली आहे. केक बनविण्याचे क्लासेस सुरु करुन युवती-महिलांना स्वावलंबी बनवले आहे. तसेच पती राहुल यांच्या माध्यमातून पेठवडगाव, कोडोली-वारणानगर, पलुस, माधवनगर आदी या ठिकाणी सात ‘लुक मेन्सवेअर’ सुरु केले. आहेत. उद्योग व्यवसायामध्ये त्यांनी चांगलेच नाव कमवले आहे. नुकत्याच चिंचवाड ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राहुल पाटील सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आले. पतीच्या प्रचारासाठी श्वेता यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्यामध्ये त्यांना यश आले.
समाजकारण, राजकारण, उद्योग सर्वच क्षेत्रात यशस्वी झेप घेणाऱ्या श्वेता पाटील यांना महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत आहे.