Maha Hit 24
Register

जाहिरात

 

मार्बल्स म्युझियम अमेरिका

schedule31 Jul 24 person by visibility 100 categoryआंतरराष्ट्रीय

१८ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून मानला जातो. संग्रहालय म्हणजेच MUSEUM या शब्दाचे मूळ-प्राचीन ग्रीक पुराणातील - MUSE हे आहे. ही कला, शास्त्र आणि साहित्य यांची देवता आहे. या देवतेचे ईजिप्तमध्ये देऊळ आहे. यात अनेक गोष्टींचा संग्रह आहे. म्हणून ते MUSEUM-ही ग्रीक लोकांची परंपरा आहे. केवळ आपल्याच नव्हे तर इतर संस्कृतीची ओळख व्हावी आणि आपण व ते हा भेद मिटून, वैश्विक सामंजस्य निर्माण करण्याची प्रमुख भूमिका ही संग्रहालये निभावतात. म्हणून आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेने ती जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावीत ही संकल्पना मांडली. आपल्या भारतातील पुण्याचे केळकर म्युझियम, नागपूरचे संत तुकडोजी महाराज पुरातत्व संग्रहालय, अंजनेरी नाशिकचे नाणी संग्रहालय, डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास संग्रहालय, चियत्रपट कलाकार चंद्रकांत मांढरे यांचे राहते घरच कोल्हापूरचे भूषण आहे संग्रहालय म्हणून मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय. 

तर औंधचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे हस्तिदंती कलाकुतींचे संग्रहालय आणि हैद्राबादचे भव्य सालारजंग म्युझियम ही आणि अशी अनेक संग्रहालये वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या दौर्या दरम्यान एक अप्रतिम अगदी आगळंवेगळं असं MARBLES नावाचं म्यझियम पाहण्याचा योग आला., जे खासकरून लहान मुलांसाठी होतं. छोट्याशा रांगणार्या बाळापासून ते१२-१५ वर्षापर्यंतच्या किशोरवयीन मुलांसाठीसुद्धा. अतिशय वैविद्धयपूर्ण कलात्मक, रचनात्मक दिलखेचक असं. आत शिरल्याबरोबर दिसतो तो रंगीबेरंगी फुगे आणि दिव्यांच्या रोषणाईने नटलेला परिसर. स्वर्ग-स्वर्ग म्हणजे आणखी काय असू शकतं वेगळं? असं भारलेलं वातावरण. प्रफुल्लित, मन ताजंतवानं करणारं खेळकर असं. वेगळ्याच विश्वात नेणारं. लहान थोर सगळ्यानाच आकषून घेणारं. सर्वत्र मुलांचा मुक्त संचार. प्रथम दर्शनी आत दिसते ती एका छोट्याशा दुमजली बोटीची प्रतिक्कृती. जिच्यातून लहान बाळं इकडून तिकडे रांगत होती. थोडी मोठी मुलं बोटीच्या जिन्यावरून धावत होती. 

वरच्या डेकवरून डोकावत होती., खिदळत होती. थोडं पुढं गेल्यावर जमिनीवरच खूप मोठा बुद्धिबळाचा पट रंगवलेला होता. त्यावर मोठ्या आकाराचे हत्ती, घोडे उंट, वजीर इ. प्यादी होती. मुलं त्या चौकोनातून फिरून बुद्धिबळ खेळत होती. आणखी पुढे गेल्यावर एक छोटं टुमदार गाव वसवलं होतं. त्याचा landscape आराखडा दाखवला होता. त्यात रस्ते, बस, मोटारी, ट्रक्स, पोस्ट ऑफीस, पाण्याची टाकी, तलाव, बोटी, भाजीमंडई आदींची ओळख अगदी कल्पकतेने करून दिली होती. तिथे ठेवलेल्या मिनी बसमध्ये मुलं चढत होती, उतरत होती. व्हील उलटसुलट फिरवून, जणू स्वतःच गाडी चालवत आहोत अशा आविर्भावात, त्याचा मनमुराद आनंद घेत होती. छोट्या घसरगुंडीवरून जात येत होती. संपूर्ण म्युझियमभर वरच्या मजल्यावरून खाली वर धालत होती. बागडत, खिदळत होती. त्यांच्या आनंदाला सीमाच नव्हती. त्याना कोणी रोखत नव्हतं, अडवत नव्हतं. सर्वत्र त्यांचा हवाहवासा वाटणारा संचार होता. हे सारं पाहून - किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती-हे बालगीत आपसुकच मी गुणगुणायला लागले. हा आनंद काही वेगळाच होता. फार सुंदर होता.


येथून वरच्या मजल्यावर जाते तो, तिथे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं IDEA-WORKS--IMAGINE-CREATE-INNOVATE:- म्हणजेच हा मुलांच्या सुजनशक्तीला, कल्पनाशक्तीला, निर्मिती क्ष मतेला वाव देणारा विभाग. - थोडंया मोठ्या मुलांसाठीहोता. - CARPENTRY विभाग-सुतारकामाचा. इथे छोटीशीच प ण खरोखरीची अवजारे होती. करवत, स्कू ड्रायवर, खिळे हातोडी, लहान लाकडी ब्लॉक्स, ते कापण्यासाठी VISE, लहान टेबले इ. गोष्टी होत्या. जवळच एका मोठ्या तक्त्या वर त्यांची चित्रे, उपयोग यांची माहिती होती. मुलं प्रत्येक वस्तु औत्सुक्याने हाताळत होती. लाकडी ठोकळे कापत होती. त्याला भोके पाडत होती. स्वयंनिर्मितीचा आनंद घेत होती. महत्वाचं म्हणजे मोठ्या अक्ष रात. SAFETY FIRST अशा सूचना होत्या. छोट्यांच्या सुरक्षिततेला केवढे महत्व.

यापुढिल विभाग फारच इंटरेस्टिंग होता. अमेरिकेत घरोघरी कुत्रीमांजरी पाळायची हौस फार. या पाळीव प्राण्याना pets म्हणतात. बच्चे क्षंपनीला खूष करण्यासाठी तिथे खेळण्यातलं छोटंसं भू भू होतं. त्याला आंघोळ कशी घालायची, ते क्रमाने लिहिलं होतं. जसं (१) RUB-A-DUB म्हणजे अंग चोळा (२) शैम्पु करा (३) पाण्याचा स्प्रे मारा. (४) अंग स्वच्छ धुवा.इ. तिथे छोटा शॉवर आणि ब्रशही ठेवलेला होता. या सगळ्याची खूपच मजा वाटली. यालाच जोडून MOnEY PLAZa नावाचा विभाग होता. यातून दैनंदिन व्यवहारात बाजारहाट, पैशाचे व्यवहार कसे करायचे याची ओळख मनोरंजनातून करुन दिली जात होती. उदा. जवळच MART POLLY नावाची एक शॉपी म्हणजे दुकान होतं. तिथे मोठ्या अक्ष रात लिहिलं होतं EARN MONEY BY WORKING At My PET CARE SHOP. यादुकानात खेळण्यातले प्राणी, त्यांचे खाद्य जसे कॅट फूड, डॉग फूड या गोष्टी होत्या प्रत्येकाचे दर लिहिले होते. कॅश कार्डने पेमेंट कसे करायचे, शेवटी सही करायची इ. गोष्टी दाखविल्या जात होत्या.


तिथेच शेजारी दुसरी शॉपी होती. तिथे खोटी संत्री, मोसंबी, आईसक्रीम या गोष्टीहोत्या. एवढंच नाही तर जयूस कसा करायचा, लेमोनेड कसं तयार करायचं हेसुद्धा दाखवत होते. यातून making and selling, learn and earn, शिका आणि कमवा याचा आदर्श पाठ शिकविला जात होता. खासकरून अमेरिकेत Earn Money ही संकल्पना जास्त प्रचलित आहे.यानंतरचा विभाग होता बैंकिंग: तिथे खासकरून लिहिलं होतं (१) Make smart Choice With Your

Money. (2) Keep Your Money Safe(3)How Much Can You Save? (4) How Can You Send Your Money Through Bank. अशी सगळी माहिती खेळातून मजेशीरपणे करून दिली जात होती. यानंतरचं मोस्ट अॅट्रॅक्शन- आकर्षण होतंSHOP Pizzaria- पिझ्झा शॉप. याच्या बाहेर मोठा फलक होता. लिहिलं होतं : (१) घरपोच व्यवस्था (२) PICK UP इ. सुविधा. येथे छोट्या छोट्या खेळण्यातून पिझ्झा कसा करायचा त्याचं प्रात्यक्षिक मुलांकडूनच

दाखविलं जात होतं. आणखी एक गोष्ट मला फार आवडली ती म्हणजे-तिथेअत्यंत मोलाच्या सूचना लिहिलेल्या होत्या.- (१) चांगली सव्र्व्हस दिलीत तर तुम्ही जास्त नफा आणि पैसा दोन्ही कमवू शकता. (२) वेळेवर सर्व्हिस देत जा. (३) make your customer happy. (4) provide service with a smile. हे सगळं वाचून तर मी थक्क झाले. किती सुंदर पद्धतीनं, मार्गदर्शक तत्वं मुलांच्या मनावर बिंबवली जातात. खूप कौतुक वाटलं मला. मधल्या पॅसेजमध्ये कांही मुलं रंगीबेरंगी चेंडू, ब्लॉक्स घेऊन खेळत होती. छोट्या सायकली फिरवत होती. धमाल चा लली होती नुसती. यापुढचा विभाग होताः Saving energy: वीज, पाणी, उष्णता इ. ऊर्जाचा वापर कमीत कमी कसा करावा याच्या मौलिक सूचना इथे होत्या. (१) ए. सी.च्या ऐवजी शक्यतो पंखे वापरा. (२) L.E.D. लाईट्सचा वापर करा. (३) जेव्हा टी.वी., मोबाईल, काँपुटर वापरत नसाल तेंव्हा प्लग काढून ठेवा. 


कारण स्विच ऑफ केल्यानंतरसुद्धा उर्जेचा वापर चार्जिंग चालू असतं (४) खोलीतून बाहेर पडताना पंखे, दिवे बंद करा. यानंतर होतं हेल्दी किचनः सर्वांचा आवडता विभाग. यात एक छोटंसं खोटं खोटं पण खरंखुरं वाटणारं किचन होतं. तेही गॅस, ओटा, वॉश बेसिन, वाट्या, भांडी, चमचे, पळ्या कपबशा, ताटं, किचन टेबल, चाळणी, ट्रे अशा सर्व गोष्टीनी सुसज्ज असं. जोडीला खास सूचनाः हेल्दी खा. पौष्टिक आहार घ्या. उदा. रंगीबेरंगी फळे, भाज्या (खोट्याखोट्या). या गोष्टीही मांडलेल्या होत्या. या सुंदर आकर्षक किचनमध्ये मुलं या वस्तू हाताळत होती. रमून गेली होती. लहान वयातच पाककलेची बीजे रुजावीत, आवड निर्माण व्हावी हा हेतू. येथून पुढे जावं तर काय?- HOCKEY: HomE TOWN: अशा आकर्षक नावाने तयार केलेला हॉकी या खेळाचा छोटासा विभाग. अमेरिकेत खेळाला महत्व फार. या विभागात हॉकी स्टिक्स, बॉल्स, नेट आणि प्ले ग्राउंडसुद्धा होतं. अत्यंत कल्पक आणि सुंदर रचना अशी की कोणालाही खे ळायचा मोह व्हावा. इथे खेळाचं महत्व मनावर ठसविणारं वाक्य लिहिलं होतं : 


रोज ६० मिनिटांचा शारिरीक व्यायाम, तुमच्या शरीराला आणि मेंदूला उत्तम ऊर्जा पुरवितो.


या विभागातून पुढे गेल्यानंतर दिसला तो सागरी विभाग.:- अगदी खराखुरा वाटेल असा. भिंतीवर निळ्या रंगात समुद्राच्या उसळलेल्या लाटा रंगविलेल्या, बोटी, भोवताली समुद्र किनारा, त्यात वाळू, शंखशिंपले, ठेवलेले खेळण्यातले रंगीत मासे, खेकडे, कासव इ. गोष्टीसुद्धा होत्या. एक छोटासा जलाशयसुद्धा होता. त्यात एक बोट-सब मरीनही होती. एकमेकांवर पाणी उडवत मुलं मनसोक्त आनंद घेत होती. शेजारीच लाईट हाउसची सुंदर प्रतिक्रुतीही होती. समोरच एक सुंदर वाक्य कोरलेलं होतं-PLAY IS The BEgiNnING OF KNOWLEDGE. असे ते सुंदर मोरपंखी बालपण डोळ्यात साठवून घेत घेत आम्ही पुढे कधी गेलो ते कळलंच नाही. आताचा हा टप्पा फारच सुंदर होता. आकर्षक, लक्ष वेधून घेणारा दिलखेचक असा. मोकळ्या मोठ्या पटांगणात, मद्धयभागी मुलं वाळूत खेळत होती. बाजूच्या भिंती मुलानी रंगवलेल्या चित्रानी नटलेल्या. तिथेच सुंदर अक्ष रात लिहिलेलं होतं:-:-move to the MUSIC.--हा संगीत विभाग.:_ मनाला मोहवून टाकणारे वाद्य संगीताचे सूर कानावर पडले आणि मन आनंदानं बहरून गेलं. तिथं गिटार, फल्यूट, ड्रम आदि वाद्ये ठेवलेली होती. संगीत ही कला अशी आहे की, ती अगदी तान्ह्या बाळापासून ते आजी आजोबानासुद्धा डोलायला लावते. संगीताचे ते सूर थेट हृदयापर्यंत जाऊन भिडतात. आजूबाजूच्या प्रत्येक भिंतीवर अशी कांही वाक्ये कोरली आहेत की, ज्यातून प्रत्येकाच्या आयुष्यातील संगीताचं स्थान अधोरेखित केलेलं आहे. जसं:- (1) I was Born With Music Inside Me मीजन्मलोतोअंतर्यामी संगीत घेऊनच.) ((2) Frequently Listen Music From Heart (मनापासून संगीत ऐका.) (3) Where Words Fail, Music Speaks (जिथे शब्द हरतात, तिथे संगीत बोलतं) (4) Everything In Universe Has A Rhythm. (विश्वातील प्रत्येक गोष्टीला एक रब्दिम असतो. ताल असतो. लय असते. अशा या रंगीबेरंगी संगीतमय, मोहमयी वातावरणातून बाहेर पडताच मुलांना खुणावतो तो त्यांच्या आवडीचा हस्तकला विभाग.:-इथे, कागदी फुले, बोटी, घरे, विमाने इ. करण्यात मुलं अगदी गुंग झाली होती. त्यासाठी लागणारं, कागद,, पुठे, कात्री, पेन्सिली, गोंद इ. साहित्य ठेवलेलं होतं. सोबत, या वस्तू कशा करायच्या याबाबतच्या सूचनाही होत्या. असं सगळं सोपं करुन ठेवलेलं होतं. यानंतरचा शेवटचा विभाग होता:- चित्रकला. मुलांना अतिशय आवडणारा. त्यांच्या प्रतिभेला, सुप्त कलागुणाना, आविष्काराला संपूर्ण वाव असलेला. मुलं इतकी मन लावून, समरसून चित्रं रंगवीत बसली होती की, आम्ही कौतुकभरल्या नजरेनं त्यांच्याकडेच पाहात होतो. ...या सगळ्या गोष्टींचं वर्णन किती आणि कसं करावं? शब्द अपुरे पडतात. आनंदानं बेभान होऊन

नाचणार्या, स्वच्छंद बागडणार्या बाळगोपाळांच्या विश्वात न बाहेर पडावसंच वाटत नव्हतं. एका वेगळ्याच धुंदीत आम्ही विहरत होतो. मात्र, येथे एक गोष्ट आवर्जून नमूद कराविशी वाटते ती ही की, या म्युझियममध्ये सर्व वयोगटातली मुलं धावत, पळत असतात. पण कुठेही कचरा नाही की, कागदाचा एकही कपटा नाही. सतत ट्रॅश गोळा करणारे कर्मचारी फिरत असतात, जमीन पुसत असतात. स्वच्छता, नीटनेटकेपणा कमालीचा. तो त्यांच्या रोमारोमात भिनलेला आहे. तसं त्यांना बाळकडूच असावं. हे मात्र खरं की, अशा या छोट्या दोस्तांच्या रंगभरील्या, जादुई विश्वात ४-५ तास अखंड भ्रमंती करत, एका अनोख्या सळसळत्या आनंदाची अनुभूती घेतली आणि मस्त मजेत, हसत खेळत तेथून बाहेर पडलो.


सौ. शैलजा स. धामणकर-निंबाळकर, १०, शिरगावकर कॉलनी, राधानगरी रोड, विष्णूनगर समोर, कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes