Maha Hit 24
Register

जाहिरात

 

मोटारसायकल चोरट्यास अटक

schedule17 Oct 24 person by visibility 89 categoryगुन्हे

कोल्हापूर- चोरीतील मोटारसायकल विक्री साठी आलेल्या गणेश संभाजी पोवार (वय 25.रा.पडळ, ता. पन्हाळा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या कडील चोरीतील दोन मोटारसायकलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल अशा एकूण तीन मोटारसायकली जप्त करून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.या पथकातील पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना चोरीतील मोटारसायकल विक्री साठी कं.बावडा ते वडणगे मार्गावरील राजाराम बंधारा परिसरात असलेल्या हॉटेल किनारा येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून विना नंबर प्लेट वरुन आलेल्या चोरट्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. 

असता त्याच्या कडील मोटारसायकल चोरीची असून त्याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजते.या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने शिरोली एमआयडीसी परिसरातुन आणखी एक मोटारसायकल चोरल्याची कबुली दिल्याने त्या दोन मोटारसायकल जप्त करून गणेश याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करून चोरीचे शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस युवराज पाटील,रामचंद्र कोळी,सागर चौगुले,शुभम संकपाळ,कृष्णात पिंगळे,प्रशांत पाटील,राजेंद्र वरंडेकर आणि लखनसिंह पाटील यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes