क्रिकेट विश्वावर शोककळा
schedule16 Apr 24 person by visibility 148 categoryक्रीडा
कोल्हापूर: क्रिकेटविश्वातून एक दुःखद बातमी सोमवारी (15 एप्रिल) समोर आली. इंग्लंडचे महान फिरकीपटू डेरेक अंडरवूड यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.
याबद्दल त्यांचा काउंटी संघ केंटने माहिती दिली आहे.साल 1963 ते 1987 दरम्यान प्रोफेशनल क्रिकेट खेळलेल्या अंडरवूड यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 3000 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
अंडरवूड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून 1966 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 86 कसोटी सामने खेळताना 297 विकेट्स घेतल्या.