Maha Hit 24
Register

जाहिरात

 

सौ. अनुराधा अथने (बोंद्रे) यांना महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार

schedule07 Mar 24 person by visibility 349 categoryरणरागिणी पुरस्कार


कोल्हापूर: जिद्द , चिकाटी, आणि हलाकीची परिस्थिती तरीही अपार कष्टाने समाजात आपला ठसा उमटविणाऱ्या आदर्श शिक्षिका सौ अनुराधा उद्धव अथने ( बोंद्रे) यांना यंदाचा महाराष्ट्राची रणरागिनी पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. यशराज प्रोडक्शनच्या वतीने दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक राजेश्वरी मोठे आणि ज्योती पाटील यांनी दिलीय. 


जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाने स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या स्वतःचा नावलौकिक मिळवून समाजासाठी आरसा ठरलेल्या कर्तुत्ववान युवती आणि महिलांचा महाराष्ट्राची रणरागिणी हा सन्मान केला जातो. यंदाही 08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन सभागृहामध्ये या महागौरव सोहळ्याचं आयोजन केलं आहे. दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या युवती व महिलांचा सन्मान केला जाणार आहे. कोल्हापुरातील आदर्श शिक्षिका अनुराधा अथने यांना खरंतर शिक्षिका व्हायचे नव्हते पण त्या खूप लहान होत्या तेव्हा त्यांचे वडिल त्यना सोडून गेले 
 त्यांच्या वडिलांचे निधन झाले. 

 घरची परिस्थिती हालाखीची त्यासाठी लहान मुलांचे क्लास घेण्यास त्यांनी सुरुवात केली. ते क्लासेस घेताना त्यांचे मन त्यामध्ये इतके रमले की त्यांनी शिक्षक व्हायचा निर्णय घेतला. त्यासाठी अथने यांनी जिद्दीने अपार कष्ट करून  

B. C. A पूर्ण करत असताना त्यांनी पुणे विद्यापीठामधून संस्कृत या विषयाचे बाह्य पद्धतीने शिक्षण ही चालू ठेवले . 
त्यांनी लग्नानंतर पुणे युनिव्हर्सिटी मधून संस्कृत मधूनच M. A व व त्यानंतर प्रतिभा कमला कॉलेज (पुणे युनिव्हर्सिटी) यांच्या अंतर्गत संस्कृत विषयामधूनच मधूनच बीएड ही पदवी प्राप्त केली 

 हे शिक्षण घेत असताना एक् लहान मुलाची जबाबदारी व श्री क्लासेस ची जबाबदारी सुद्धा योग्य रीतीने पार करत होत्या लग्नानंतरही त्यांनी श्री क्लासेस मध्ये विद्यार्थी घडवण्याचे काम सुरूच ठेवले. 

त्यांना या प्रवासामध्ये जशी माहेरच्यांची खंबीर साथ मिळाली तशीच लग्नानंतरही त्यांना सासरची तेवढेच खंबीर साथ मिळाली. करोना काळा मधील आपल्या जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांना तोंड देत आपले स्वतःचे शिक्षण आणि क्लासचा रिझल्ट दोन्हीचाही दर्जा कायम राखला. 

अथने यांच्या श्री क्लासेसच्या माध्यमातून आत्ता पर्यंत अठरा वर्षात जवळजवळ १०००-१२०० विद्यार्थ्यांना संस्कृत या विषयाचे ज्ञान देण्यात त्यांना यश मिळाले.  

शिकवण्याची उत्कृष्ट दर्जाची पद्धत संस्कृत या विषयाबद्दल मुलांना निर्माण झालेली गोडी तसेच क्लास मधील विविध कार्यक्रमांतर्गत पारंपारिक वेशभूषा, सहल, निरोप समारंभ या सर्वांमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे. अथने यांच्या श्री क्लासचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही जाहिरात आणि प्रसिद्धी न करता त्यांच्या, क्लासच्या नावाची प्रसिध्दी अजून हि कायमस्वरूपी दिसून येत आहे. 

 एक आदर्श शिक्षिका म्हणून त्यांची समाजात ओळख निर्माण झाली आहे. आजही त्यांच्या क्लासमध्ये शिकलेले विद्यार्थी प्रामाणिकपणे त्यांना कुठेही भेटले तरी आदराने त्यांच्या पुढे वागतात. हीच त्यांच्या कामाची पोच पावती असं म्हणता येईल. 

कोरोना काळामध्ये सुद्धा अनुराधा अथने यांनी आपल्या शिक्षणा साठी कोल्हापूर ते पुणे असा प्रवास करत , स्ट्रगल करत केले आहे. B. Ed चे शिक्षण घेत असताना 
प्रतिभा कॉलेजची संपूर्ण टीम आणि प्राध्यापक गीता कांबळे यांच्या पाठिंब्यामुळे हा अवघड प्रवास करत त्या संस्कृत विषयातील यशस्वी शिक्षिका बनल्या. 

समाजातील विविध माध्यमातून त्यांच्या या कामाची, जिद्दीची दखल घेत त्यांना 2023 साली राजारामपुरीतील नगरसेवक महेश उत्तुरे व प्रज्ञा उत्तुरे यांच्या तर्फे *नवदुर्गा कर्तुत्वान पुरस्कार* 2023 ने अनुराधा अथने यांचा सन्मान करण्यात आला   

काळावरती उमटलेल्या सुवर्णमुद्रा 2023 राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार आणि रोखठोक मराठी साहित्य संमेलनात आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. 

अनुराधा अथने यांना भविष्यात संस्कृत विषय हा केवळ शालेय स्तरावर न राहता संस्कृत भाषाचे ज्ञान हे सर्वांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी त्याला लहान मुले आणि महिलांसाठी क्लासेस सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा स्वतःच्या हिमतीवर आणि जिद्दीने यश संपादन करणाऱ्या सौ अनुराधा अथने यांना महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes