निवेदिका कु. तेजस्विनी रजपूत यांना महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार
schedule21 Feb 24 person by visibility 141 categoryरणरागिणी पुरस्कार
कोल्हापूर: जिद्द , चिकाटी, आणि अपार कष्टाने 2023 चा देशभूषण आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झालेल्या महावीर कॉलेजच्या आदर्श विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी शिवसिंग रजपूत यांना यंदाचा महाराष्ट्राची रणरागिनी पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. यशराज प्रोडक्शनच्या वतीने दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक राजेश्वरी मोठे आणि ज्योती पाटील यांनी दिलीय.
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाने स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या स्वतःचा नावलौकिक मिळवून समाजासाठी आरसा ठरलेल्या कर्तुत्ववान युवती आणि महिलांचा महाराष्ट्राची रणरागिणी आवडणे सन्मान केला जातो. यंदाही 08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन सभागृहामध्ये या महा गौरव सोहळ्याचं आयोजन केलं आहे. दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या युवती व महिलांचा सन्मान केला जाणार आहे.
कोल्हापुरातील तेजस्विनी रजपूत यांचे बीए बीएड हे शिक्षण पूर्ण झालं आहे त्याना काव्यवाचन, एकपात्री अभिनय व फॅशन शो अशा विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त करत पारितोषिकांचा सन्मान मिळविला आहे. तेजस्विनी यांनी कोरोना काळामध्ये वयोवृद्धांचा सर्वे असो किंवा पोलिसांसोबत काम असो अशा केलेल्या विविध कामाबद्दल त्यांना कोल्हापूर पोलीस यांच्याकडून कोविड योद्धा व स्वराज्य बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ही कोविड योद्धा असा पुरस्कार मिळालेला आहे. कॉलेजमध्ये असताना एनसीसी विभागातून कोरोना काळामध्ये केलेल्या कार्याबद्दल कोल्हापूर पोलिसांकडून तसेच स्वराज्य बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गौरव झाला.
तेजस्विनी यांनी मर्दानी खेळाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून बोट चालवणे पूर परिस्थिती हाताळणे असा डिझास्टर मॅनेजमेंटचा व्हाईट आर्मीचा कोर्स पूर्ण केला आहे. अनेक कार्यक्रमांची निवेदन सुद्धा केले आता सध्या निवेदन क्षेत्रात काम सुरू आहे. तसेच त्यांची युवती सेना (शिवसेना) शिरोळ तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. लहान वयातच इतकी मोठी उत्तुंग भरारी घेत मुलींनी कशा पद्धतीने आपली स्वतःची ओळख निर्माण करायची हे तेजस्विनी रजपूत यांच्याकडून शिकता येण्यासारखा आहे. त्यांच्या यशस्वी जिद्दीबद्दल त्यांना महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.