Maha Hit 24
Register

जाहिरात

 

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतले पंतप्रधान पदाची शपथ.....

schedule09 Jun 24 person by visibility 113 categoryलोकसभा निवडणुक


मुंबई: नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.एनडीए आघाडीनं लोकसभा निवडणुकीत 293 जागा मिळवत सत्ता स्थापन केली आहे. तर भाजपला स्वबळावर 240 जागा मिळवण्यात यश आलं आहे.

या मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांबरोबरच अनेक नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाला दिलं जाणार यावर चर्चा सुरू झाली आहे. शिवराजसिंह चौहान आणि मनोहरलाल खट्टर यांची नावं अध्यक्षपदाच्या चर्चेत होती. पण त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं आता कुणाचं नाव समोर येणार याची चर्चा सुरू आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes