दीपक अथणे यांना नेशन बिल्डर-आदर्श शिक्षक पुरस्कार
schedule25 Oct 24 person by visibility 56 categoryशैक्षणिक
कुंभोज प्रतिनिधी ; विनोद शिंगे
वीर सेवा दल जिल्हा मध्यवर्ती सदस्य, आंतरभारती विद्यालय इचलकरंजी येथील संस्कृत विभाग प्रमुख, शालेय पोषण आहार प्रमुख श्री दीपक अथणे सर यांना बुधवार, दि.23/10/2024 रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुरचे प्र.कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय नेशन बिल्डर - आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदुम, चेअरमन अजित कुरडे, प्रा. प्रशांत कांबळे, यतिराज भंडारी, अन्य रोटरी पदाधिकारी, तसेच आंतरभारती शिक्षण मंडळ, इचलकरंजीचे अध्यक्ष श्यामराव नकाते, संचालिका सुनंदा भागवत, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा फाटक, पर्यवेक्षक कपिल कोळी,सर्व स्टाफ,आजी - माजी मुख्याध्यापक, विविध संस्थाचे पदाधिकारी,अनेक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,पालक, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्याने उपस्थित होता.
दीपक अथणे हे मागील 17 वर्षापासून महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. संस्कृत विषय अध्यापन सोबतच, शालेय पोषण आहारचे काम उत्तमपणे करत आहेत.वर्षभर अनेक ठिकाणी व्याख्यान साठी जातात. योगासन, शाकाहार, वृक्षारोपन यासाठी वीर सेवा दल मार्फ़त सामाजिक कार्य करत आहेत.