कोल्हापुरात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
schedule30 Aug 24 person by visibility 44 categoryखेळ
कोल्हापूर: क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव उंचावणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने भवानी मंडप येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय खेळाडू अनुराधा घुले यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या प्रसंगी उपस्थित खेळाडूंनी व क्रीडा प्रेमींनी दोन्ही महान क्रीडापटूंना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाचा गौरव केला आणि त्यांच्या कार्याचे स्मरण केले. खाशाबा जाधव यांच्या कर्तृत्वाचाही उल्लेख करून भारतीय क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्या योगदानाची महत्त्वाची माहिती दिली.