सर्वसामान्यांना कांदा रडवणार
schedule14 Aug 24 person by visibility 232 categoryउद्योग

सध्या लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आले असून बहुतांश बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी भावात मोठी सुधारणा झाली आहे, काद्यांचे दर प्रति क्विंटल मागे 490 ते 650 रुपयांनी वधारले आहेत. सध्या कांद्याला प्रति क्विंटल 3390 ते 3550 रुपये एवढा दर मिळत आहे. कांद्याचे दर वधरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये 1 लाख 18 हजार 240 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे.