पंचगंगा नदी धोका पातळी जवळ ; शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद
schedule25 Jul 24 person by visibility 90 categoryसामाजिक
कोल्हापुर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीतील पाणी पातळी वेगाने वाढत असून धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी-रजपूतवाडी दरम्यान पाणी आल्याने पोलिसांनी शिवाजी पुलावरील वाहतूक बुधवारी रात्री बंद केली.
कोल्हापूरच्या विविध भागांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आणि शेतजमिनींचे नुकसान झाले आहे. पंचगंगा नदीचा पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुराचा धोका लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येत आहेत.