Maha Hit 24
Register

जाहिरात

 

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे पॅनेल

schedule20 Aug 24 person by visibility 141 categoryनोकरी


कोल्हापूर : सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालयाच्या आस्थापनेवर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गारगोटी, गडहिंग्लज, पन्हाळा, शाहुवाडी, इचलकरंजी, कळे, पेठवडगाव, राधानगरी येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील सरकारी अभियोग पक्षाचे कामकाज पहाण्याकामी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 19 (3) अंतर्गत एकुण 12 (बारा) विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे तात्पुरत्या स्वरुपातील पॅनेल तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता निवड समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी जाहीर सुचना काढली आहे. 

या सुचनेतील नमुद अटी व शर्तीनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी 2 सप्टेंबर 2024 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता ममता पाटील यांनी केले आहे.

याबाबतची संपूर्ण जाहीरसुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://kolhapur.nic.in या संकेतस्थळावर दि. 19 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. 


जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes