विषबाधा की घातपात
schedule29 Nov 24 person by visibility 64 categoryराशीभविष्य
कुंभोज/ वार्ताहर(विनोद शिंगे)
करवीर तालुक्यातील मांडरे या गावांमधील संपूर्ण कुटुंबास विषबाधा झालेल्यांपैकी एकाचा आज मृत्यू झाला .मिळालेल्या माहितीवरून मांडरे या गावांमधील सर्वसामान्य कुटुंबातील पांडुरंग विठ्ठल पाटील वय 65 , कृष्णात पांडुरंग पाटील वय 35 , प्रदीप पांडुरंग पाटील वय 32 , रोहित पांडुरंग पाटील वय 30 , या संपूर्ण पाटील कुटुंबीय पैकी सदस्यांना दिनांक 15 नोव्हेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली. तर सौ.गंगा कृष्णात पाटील वय 25 व कुमारी ओवी कृष्णा पाटील वय 3 वर्ष यांना विषबाधा झाली नाही. सर्वसामान्य व अशिक्षित कुटुंबीय असल्यामुळे सुरुवातीस या घटनेचे गांभीर्य न ओळखता त्यांनी प्राथमिक स्तरावर उपचार घेतले पण जसजशी सर्वांच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ लागला ,त्यावेळेला पुढील उपचारासाठी त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद तेव्हा करवीर पोलीस स्टेशनला देण्यात आली होती .
27 नोव्हेंबर रोजी या कुटुंबातील पांडुरंग विठ्ठल पाटील यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले .तसेच कृष्णात पांडुरंग पाटील व रोहित पांडुरंग पाटील यांची तब्येत सिरीयस आहे .संपूर्ण कुटुंब दवाखान्यात असल्यामुळे निश्चित असे काही कारण कोणाला सांगता येत नाही या सर्व घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली आहे.अन्नातून झालेली विषबाधा की घातपात याचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे .
सर्वसामान्य कुटुंबातील सर्व पाटील कुटुंबीय दवाखान्यात असल्यामुळे त्यांच्या स्थावर मालमत्तेपैकी गाय- म्हैस, दोन बैल ,ट्रॅक्टरचा ट्रेलर आदी वस्तूंची विक्री करून उपचार करण्यात येत आहे . तसेच झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण गाव एकत्र येऊन लोक वर्गणीतून जवळपास दोन लाख रुपये जमा करून या पाटील कुटुंबीयांवर उपचार सुरू आहे. अन्नातून विषबाधा नसून हा घात -पात आहे अशी संपूर्ण गावात कुजबूत सुरू आहे .
मांडरे गावातील विषबाधा मधून दवाखान्यात असलेल्या पाटील कुटुंबीयांपैकी पांडुरंग पाटील यांचे निधन झाले आहे याची नोंद घेऊन ऍडमिट असलेल्या नातेवाईकांचा जबाब घेऊन पुढील तपास सुरू आहे.अन्नातून विषबाधा की घातपात हे सद्यस्थितीला सांगता येत नसल्यामुळे डॉक्टर्स यांचा सल्ला , रिपोर्ट ,व मयत यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
करवीर पोलिस प्रशासन .