टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट
schedule27 Jun 24 person by visibility 212 categoryक्रीडा

दिल्ली : टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपचा सेमीफायनला सामना आज टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना आज रात्री आठ वाजता खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
विशेष म्हणजे टी-ट्वेन्टीचा पहिला सेमीफायनलचा सामना आज सकाळीच पार पडला आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने अतिशय सहजपणे जिंकत थेट फायनलमध्ये मजल मारली आहे. या सामन्यात पाऊस पडला तर या सामन्यासाठी एक विशेष रिजर्व डे ठेवण्यात आला होता.
पण दुसऱ्या सेमीफायनलसाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे दुसरा सेमीफायनलचा सामना हा दोन बलाढ्य संघांमध्ये आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी या सामन्यासाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी करो या मरोच्या धर्तीवर असणार आहे. असं असलं तरी आयसीसीने पाऊस पडला तर या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच पाऊस पडला तर ओव्हर कमी करण्याचा नियम देखील घेण्यात आला आहे.