राक्षीच्या संतोषची श्रीलंकेबरोबर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात निवड
schedule03 Jun 24 person by visibility 80 categoryक्रीडा
देवाळे २: राक्षी,ता.पन्हाळा येथील आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेटपटटू संतोष सर्जेराव रांजगणे यांची श्रीलंका संघाबरोबर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. डिफेण्टली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडिया आयोजित नोएडा-उत्तरप्रदेश येथे भारत आणि श्रीलंका संघामध्ये टी-२० क्रिकेट ५ सामने होत आहेत. ७ ते १६ जूनअखेर दिव्यांगासाठी प्रथमच रात्रीच्या प्रकाशझोतात होणाऱ्या सामन्यात संतोष अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत असून तो ६ व्या क्रमांकावर फलंदाजसाठी उतरणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ दोघांचा समावेश असून त्याच्याबरोबर कराड-सातारचा साहिल सय्यदही खेळणार आहे.
डी.सी.सी.आय. म्हणजेच डिफेण्टली एबल्ड क्रिकेट कौन्सिलचे सचिव विक्रांत चौहान, भारतीय व्हीलचेअर क्रिकेटचे स्कॉडरनलीडर अभय प्रतापसिंह यांचे भारतीय संघामध्ये निवड झाल्याचे नुकतेच पत्र मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, विभागीय सामने, टी-२० तसेच आय.पी.एल. सामन्यांमधील अष्टपैलू खेळी तसेच क्रिकेटबद्दलचे प्रेम पाहून आपली निवड झाल्याचे संतोष यांनी सांगितले.
२०१७ पासून त्यांनी सुमारे १० आंतरराष्ट्रीय, २५ राष्ट्रीय तर आय.पी.एल. चे ७ सामने खेळले असून सदृढ लोकांनी खेळाकडे
वळत तसेच दिव्यांग लोकांनी घरी न बसता खेळाच्या मदतीने, खेळाच्या माध्यमातून सशक्त आयुष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. तसेच वडिलांना अपघाताने अपंगत्व आले तरी त्यांनी मला क्रिकेटसाठी प्रोत्साहित केले आणि ग्रामस्थांचा पाठबळ असल्याचे रांजगणे यांनी सांगितले.
कोट - माझे पती आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट खेळतात, दुरवरचा प्रवासाने कोल्हापूरचा नावलौकिक देशात करतात, याचा अभिमान वाटतो. -- प्राजक्ता रांजगणे, पत्नी.
-----------------------
कोट - भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघ : सोमजित सिंग - कर्णधार, वीर संधू - उपकर्णधार, अनमोल वशिष्ठ, सौरभ मल्लिक, कबीर भदोरिया, उमेश कौपीकर, संतोष रांजगणे (अष्टपैलू), जयंत आल्ट, संदीप कुंडू, राजा बाबू, रोहित अनोग्रा, साहिल सय्यद, हरीशकुमार, सागर बीआर,
सुनिल राव, सुरेश एस., राखीव- प्रशांतकुमार, भीमा कुंती, कुबेरसिंग आणि व्यवस्थापक विश्वनाथ गुरव, कार्यकारी अधिकारी शिवप्रसाद