पंचगंगा पाणी पातळीत वाढ
schedule02 Jul 24 person by visibility 98 categoryकोल्हापूर
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे.
गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यात धुवाधार पाऊस असून धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे.'राधानगरी'तून प्रति सेकंद १ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी १८ फुटाच्या वर गेली असून सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.