रोहित शर्माला दुखापत: पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार का ?
schedule06 Jun 24 person by visibility 80 categoryक्रीडा
दिल्ली : टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने 97 धावांचं आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने विजयी धावांचा पाठलाग करताना 52 धावांची खेळी केली. रोहितला टीम इंडियाच्या डावातील नवव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर दुखापत झाली. रोहित त्यानंतर काही बॉल खेळला. मात्र त्यानंतर दुखणं असह्य झाल्याने रोहित दहाव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर फिजीओसोबत मैदानाबाहेर गेला.
बस साधारण (बाहुला) दुखतंय. आता उद्यापर्यंत बघुयात कसं वाटतंय”,असं रोहितने दुखापतीबाबत सामन्यानंतर म्हटलं. तसेच रोहितने खेळपट्टी आणि सामन्याबाबत प्रतिक्रिया दिली. पीचकडून काही मदत होईल हे ठरवणं अनिश्चित होतं. या खेळपट्टीला फक्त 5 महिनेच झाले आहेत. त्यामुळे या खेळपट्टीवर कसं खेळायचं याची माहिती नाही. मला नाही वाटतं की दुसऱ्या डावात आम्ही बॅटिंग केली तेव्हा खेळपट्टी स्थिर झाली होती. गोलंदाजांसाठी फार काही विशेष नव्हतं. या खेळपट्टीने विचार करायला भाग पाडलं”,असं रोहितने खेळपट्टीबाबत म्हटलं.