Maha Hit 24
Register

जाहिरात

 

सौदी अरेबियाती हजयात्रे मृत्यूचे तांडव

schedule20 Jun 24 person by visibility 155 categoryआंतरराष्ट्रीय

मुंबई : जगभरातील मुस्लीम धर्मियांची सर्वात मोठी मानली जाणारी सौदी अरेबियाती हजयात्रे उष्णतेचा अगदी कहर झाल्याने मृत्यूचे अगदी तांडवच झाले. मक्केत तापमानाचा पारा 52 डिग्रीपर्यंत पोहचल्याने प्रचंड तापमानाने 550 हून अधिक हजयात्रेकरुंचा मृत्यू पावल्याची धक्कादायक मृत्यूने जग सुन्न झाले आहे. 

हा आकडा प्रचंड धक्कादायक आहे. त्यामुळे सौदी अरबाच्या एकूण तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विविध देशाच्या नागरिकांच्या मृत्यूमुळे सौदी अरबच्या आरोग्य मंत्रालयाने उष्णतेच्या लाटेने 2700 हून अधिक श्रद्धाळु आजारी पडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हजयात्रेतील मृत्यूचा हा मोठा आकडा पाहून यास केवळ प्रचंड तापमान जबाबदार आहे की आणखी काही कारणे यामागे आहेत.

मक्का हज यात्रेत इतके मृत्यू नेमके कशामुळे झाले यावर आता जगभरात सवाल केले जात आहेत. मंगळवारी अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की मरणाऱ्यांमध्ये एकट्या इजिप्तचे नागरिक होते. त्यांचा मृत्यू उष्णतेच्या लाटेने झाला असल्याचे म्हटले जात आहे. इजिप्तमधून आलेल्या बहुतेक यात्रेकरूचा मृत्यू उष्णतेने झाला आहे. केवळ एकाचा मृत्यू गर्दीत टक्कर झाल्याने झाला आहे. एएफपीच्या बातमीनूसार मरणाऱ्या विविध देशांच्या नागरिकांची एकूण संख्या 577 इतकी झाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes