Maha Hit 24
Register

जाहिरात

 

कोल्हापूरच्या रीवा फुटबॉल क्लबच्या विद्यार्थ्यांची निवड

schedule12 Aug 24 person by visibility 250 categoryक्रीडा


कोल्हापूर ; रिवा फुटबॉल क्लब कोल्हापूरचे मुद्दसेर शेख, सार्थक मोरेआणि शौर्य गवळी यांची एसजीव्हीपी फुटबॉल क्लब अहमदाबाद (गुजरात) १७ वर्षाखालील फुटबॉल संघासाठी निवड झाली आहे.

 एसजीव्हीपी फुटबॉल क्लब गुजरात राज्य फुटबॉल असोसिएशनच्या १७ वर्षाखालील युवा लीग २०२४ मध्ये सहभागी होणार आहे. रिवा फुटबॉल क्लबचे संस्थापक - प्रशिक्षक कमलेश मारडिया प्रशिक्षक स्वप्नील पार्टे, योगेश हिरेमठ, प्रणव कणसे त्यांना गेल्या ३ वर्षांपासून प्रशिक्षण देत आहेत यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रिवा फुटबॉल क्लब परिवार त्यांना त्यांच्या आगामी फुटबॉल भविष्यासाठी शुभेच्छा देत आहे. रिवा फुटबॉल क्लब कोल्हापूर पोलीस फुटबॉल मैदानावर सोमवार ते शुक्रवार नियमित सराव करतात. त्यांच्या या निवडीमुळे या विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes