आशियाई कुस्ती स्पर्धेत पट्टणकोडोली गावाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा; माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर
schedule29 Jul 24 person by visibility 454 categoryक्रीडा

थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत पट्टणकोडोली ता. हातकणंगले येथील कु. रोहिणी खानदेव देवबा हिने गोल्ड मेडल तर कु.यश काशिनाथ कामांन्ना याने सिल्वर मेडल मिळवून भारतासह आपल्या तालुक्याचे नाव केल्याबद्दल त्या दोघांचा सत्कार मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी केला.
तसेच यापुढेही कुस्ती क्षेत्रात अशीच कामगिरी करत जास्तीत जास्त मेडल मिळवून आपल्या प. कोडोली गावचा दबदबा कायम ठेवावा अशा शुभेच्छाही यावेळी दिल्या.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख आण्णा जाधव, लक्ष्मण पुजारी, किसन तिरपणकर, पोपट कांबळे, मारुती रांगोळे, पिंटू माळी,शिवा डावरे, रामा कुशाप्पा, सूकुमार बोरगाव, सोमनाथ कामांन्ना तसेच कामांन्ना कुटुंबीय,देवबा कुटुंबीय व तालमीतील पैलवान उपस्थित होते.