श्रद्धा कपूर आगामी चित्रपटाबाबत बनणार नागिण
schedule16 Nov 24 person by visibility 73 categoryमनोरंजन

दिल्ली: निर्माता निखिल द्विवेदी आगामी ‘नागिण’ चित्रपटाची तयारी करत आहेत. या आगामी बिग बजेट चित्रपटाती श्रद्धा कपूर मूख्य भूमिकेत दिसणार आहे. निखिल द्विवेदीने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, या भूमिकेसाठी श्रद्धा कपूर त्यांची पहिली पसंत होती. श्रद्धा कपूरला या चित्रपटासाठी खूप आधीच फायनल गेलं केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं आहे.
निखिल द्विवेदी यांनी सांगितलं की या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. स्क्रिप्ट पूर्ण होण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला. तीन वर्षात त्या स्क्रिप्टमध्ये अनेक बदलही करण्यात आले, मात्र अखेर ही स्क्रिप्ट पूर्ण झाली असून लवकरच या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे.