राज्य कर अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात......
schedule21 Oct 24 person by visibility 195 categoryगुन्हे
अधिक माहिती अशी की तक्रारदार यांची ऑनलाईन ग्रीस रीपॅकिंग करण्याची कंपनी असून कंपनीची तक्रारदार यांच्याकडे आलेल्या नोटीसमध्ये, त्यांची कंपनी जीएसटी नियमांचे पालन करत नसल्यामुळे त्यांना दीड ते दोन लाख रुपयांच्या दंडाची धमकी देण्यात आली होती. तसेच हा दंड टाळण्यासाठी 25,000 लाचेची मागणी करण्यात आली. ही माहिती लाचलुचपत विभागाला मिळताच पथकाकडून सापळा रचत आरोपी निवास पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी, पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, अजय चव्हाण, विकास माने, सुनील घोसाळकर सुधीर पाटील, सचिन पाटील, कृष्णा पाटील, कुराडे व दावणे यांच्या पथकाकडून करण्यात आली.
त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट ने कोणतेही शासकीय काम करून देण्यास कायदेशीर फीव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
मोबाइल: 9764140777
कार्यालय क्रमांक: 0231-2540989
ई-मेल: dyspacbkolapur@gmail.com
टोल फ्री क्रमांक: 1064