Maha Hit 24
Register

जाहिरात

 

योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात विशेष प्राविण्य

schedule04 Sep 24 person by visibility 66 categoryशैक्षणिक

निर्भिड लेखणी, आकर्षक आणि मनाला भोवून टाकणाऱ्या कवितांचे लिखाण करणारे, इंग्रजी विषयावर पक्की वचक असणारे, विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची भीती न राहता इंग्रजी विषयाची आवड निर्माण करणारे असे गगनबावडा तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर मा. वी. शेनवडे शाळेत अध्यापनाचे काम करणारे श्री सरदार कृष्णात पाटील यांना यंदाचा स्पीड न्यूज 24 कडून दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

सरदार पाटील हे पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावचे रहिवासी असून त्यांनी इंग्रजी विषयात विशिष्ट प्राविण्य मिळवले आहे. त्यामुळे दरवर्षी शाळेचा इंग्रजी विषयाचा 100% निकाल लागतो. गतवर्षी त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनी प्रांजली(१००/ 98) मगदूम व राधिका पाटील (100/ 95) यांनी इंग्रजी विषयात यशस्वी झेप घेतली आहे. शंकर पार्वती शिक्षण प्रसारक मंडळ , स्वामी विवेकानंद युवती मंडळ सलग्न नेहरू युवा केंद्र कोल्हापुर या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. गगनबावडा, पन्हाळातील कांतीकारी शिक्षक मासिकात लिखाण, तसेच त्यांची यश परपेकट नोटस , यश इंग्रजी व्याकरण चारोळ्या 156 कविता 37 ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

इंग्रजीचा पाया, यश स्पोकन इंग्लीश ही आगामी पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या अथक कष्टांमुळे, आणि परिपूर्ण मार्गदर्शनामुळे त्यांचे विद्यार्थी शिक्षक, वकिल, इंजिनियर, डॉक्टर, तहसिलदार, सेल्स, टॅक्स इन्स्पेक्टर, डी फार्म, पोलिस, आर्मी अन्य अनेक क्षेत्रात यशस्वी कार्यरत आहेत. याचबरोबर सरदार पाटील हे आजी, माजी विद्यार्थ्यांना व पालक यांना मोफत मार्गदर्शन समुपदेशन व करिअर गायडन्स करत असतात.

सरदार पाटील यांचा शैक्षणिक कार्यासोबतच समाजकार्यातही विशिष्ट सहभाग दिसून येतो. गरीब गरजू व निराधार मुलाना क्लासेस व्दारे मोफत शिक्षण चालवण्याचा उपक्रम गेली ते अनेक वर्ष करत., मराठी इंग्रजी व गणित विषयाची 407 पुस्तकाचे मिनी वाचणालय [यश स्टडी सर्कल] उपलब्ध करून देणारे एकमेव शिक्षक म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती पसरली आहे.


जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes