जेएसटीएआरसी कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी
schedule27 Jul 24 person by visibility 172 categoryखेळ
यावर्षी या संस्थेच्या कोल्हापूर शाखेतील दोन विद्यार्थी कु. नील भोसले( वि. स.खांडेकरचा विद्यार्थ्यी कोल्हापूर.) व कु.राणोजी माने( संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल)आणि त्यांचे मार्गदर्शक व कोल्हापूर संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले यांच्याबरोबर या स्पर्धेत सहभागी होते . कोल्हापूरचा संघ हा या मुख्य संघाच्या इतर सदस्यांच्या बरोबरीने दक्षिण कोरिया येथील स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व केले
ही स्पर्धा कोरियातील चुनचेऑन शहर आणि तायक्वॅान्डो शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तायक्वॅान्डो वॉन , मुजु पार्क ,जलाबोकदो राज्य , या जगातील प्रथम क्रमांकाच्या भव्य तायक्वॅान्डो क्रीडा संकुला मध्ये पार पडल्या .
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याबरोबरच इतर उच्च प्रशिक्षण यात फाइट, पुमसे, स्वसंरक्षण आणि आत्मरक्षा यांचे प्रशिक्षण ही मीळाले. या स्पर्धा दि. १० जुलै ते २३ जुलै , २०२४ या दरम्यान द. कोरिया येथे संपन्न झाल्यां. तसेच कोरियायील जागतिक तायक्वॅान्डो मुख्य प्रशिक्षण केंद्रास भेट दीली. कोरिया स्पर्धेतील सहभाग म्हणजे तेथील तायक्वॅान्डो प्रशिक्षण , माहिती आत्मसात करण्याबरोबरच जागतिक हेड क्वार्टर (कुक्कीवॉन) पाहण्याची अत्यंत दुर्मिळ संधी या संघास मिळाली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरच्या नील भोसले (वि. स. खांडेकर) व राणोजी माने (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) कोल्हापूर शाळेचे विद्यार्थी यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत स्पायरिंग व पुमसे या दोन प्रकारा मध्यें तीन सुवर्ण व दोन रौप्य व एक कांस्य पदकाची कमाई केली., नील भोसले एक सुवर्ण व एक रौप्य व एक कांस्य पदक राणोजी माने दोन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळाली
या दोघांना प्रशिक्षक अमोल भोसले,नवीन दवे व ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला, यांचे मार्गदर्शन लाभले.