अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स आता पुढच्या वर्षीच पृथ्वीवर परतणार
schedule08 Aug 24 person by visibility 140 categoryआंतरराष्ट्रीय
दोघांना सुरक्षित परत आणण्यासाठी नासाच्या रणनितीचा त्यांनी खुलासा केला. क्रू 9 मिशन नासाने सुरु केलं, तर पुढच्यावर्षीपर्यंत थांबाव लागेल. म्हणजे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर 2025 मध्ये पृथ्वीवर परत येतील. क्रू 9 साठी आम्ही दोन अंतराळवीर येथूनच पाठवू. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर क्रू 9 टीमचा भाग बनून त्यांच्यासोबत अवकाश तळावर काम करतील. मग फेब्रुवारी 2025 मध्ये चारही अंतराळवीरांना परत आणण्यात येईल. नासाने अजूनपर्यंत या प्लानला मंजुरी दिलेली नाही असं नासाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.