सुनीता विल्यम्स अडकल्या अंतराळात
schedule26 Jun 24 person by visibility 107 categoryआंतरराष्ट्रीय
दिल्ली : गेल्या बारा दिवसांपासून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्याचे सहकारी बुच विल्मोर अंतराळात अडकल्या आहेत. ते 5 जून रोजी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टाने अंतराळ स्थानकावर पोहचले होते आणि 13 जूनला परतणार होते. परंतु गेल्या बारा दिवसांपासून त्यांचे अंतराळामधील बिघाड इंजिनिअर दुरुस्त करु शकले नाही. आता त्यांच्याकडे केवळ 27 दिवसांचे इंधन शिल्लक आहे. त्याचे अंतराळयान स्टारलाइनरमधील हेलियम लीक होत असल्यामुळे ते परतू शकत नाही.
बोईंग स्टारलाइनर अंतराळयानामध्ये बिघाडानंतर त्यांचे परत येणे चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. आता नवीन तारीख दिली नाही. बोइंगचा स्टारलाइनर कॅप्सूल 5 जून रोजी अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी फ्लोरिडा येथील कॅप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरुन रवाना झाले होते. 25 तासांच्या उड्डानंतर इंजीनिअरांना स्पेसशिपमधील थ्रस्टर सिस्टममध्ये पाच ठिकाणी हेलियम लीक होत असल्याचे समजले. त्यानंतर अंतराळयान परत आणण्याचा निर्णय स्थगिती करण्यात आला.