ताराराणी महिला आघाडी होम मिनिस्टर कार्यक्रमाने महिला भारावल्या
schedule30 Aug 24 person by visibility 95 categoryमनोरंजन
कुंभोज प्रतिनिधी ; विनोद शिंगे
खेळ करमणुकीचा व मनोरंजनाचा खेळ पैठणीचा कार्यक्रम ताराराणी पक्ष व महिला आघाडीच्या वतीने जिव्हाजी मंगल कार्यालय, इचलकरंजी येथे आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ सौ. मोश्मी आवाडे यांच्या हस्ते तसेच माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.
आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचीक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून निवेदक विवेक व वीणा यांच्या सोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक फ्रिज सौ. किरण जगदाळे, द्वितीय क्रमांक ३२" टीव्ही सौ. आशा माने, तसेच पैठणीचे विजेते आसावरी बडवे, श्रद्धा माळी, शितल पाटील, शिवानी वेरणेकर, मेघा हजारे या महिलांना पैठणी असे विजेत्यांनी अनुक्रमे हि बक्षीसे पटकावली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना लकी ड्रॉ व स्पॉट गेम ५० प्रेशर कुकर मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते सर्व महिला भगिनींना देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, अंजली बावणे, माजी नगरसेविका लक्ष्मी पोवार, ताराराणी महिला आघाडी कार्याध्यक्षा नजमा शेख, नंदा साळुंखे, सेक्रेटरी सपना भिसे, सुनिता आडके, दिपाली लोटे ,राधिका तारळकर, शोभा कापसे, अरुणा माने, पोवार वहिनी, सीमा कमते, जयश्री शेलार, मंगल सुर्वे, अंजुम मुल्ला,सोनाली तारदाळे, शोभा रोडे, अश्विनी लोखंडे, राधिका येलगट्टी, मायरा इमानदार, रेखा शिंदे, मेघा माने, अनिता जाधव, शकिर नाईकवाडे, अनुराधा फतले, शेटके वहिनी, राजू बोंद्रे, दिपक सुर्वे, नितेश पोवार, सतीश मुळीक, इम्रान मकानदार, कपिल शेटके, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.