Maha Hit 24
Register

जाहिरात

 

लोकसभा निकालाने राज्यातील समीकरणे बदलली.....

schedule06 Jun 24 person by visibility 137 categoryलोकसभा निवडणुक

मुंबई : लोकसभा निकालाने राज्यातील समीकरणे बदलली आहेत. मोठ्या यशाची अपेक्षा असताना पदरात पराभव आल्याने महायुतीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. पराभवाची कारणं शोधली जात आहे. महाविकास आघाडीने मारलेली मुसंडी ही महायुतीसाठी धक्कादायक आहे. राज्यातील अंडरकरंट दुर्लक्षित केल्याने हा फटका बसल्याची चर्चा रंगली आहे. राज्यात वेगाने घडामोडी घडत आहे. केद्रांत सत्ता स्थापन्याच्या हालचाली वाढल्यानंतर महायुतीतील नेते, खासदार दिल्लीकडे कुच करणार आहेत. पण त्यापूर्वी मुंबईत बैठकांमागून बैठकांचे सत्र सुरु आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसची आज अजित पवार यांच्या निवास्थानी बैठक होत आहे. महायुतीला राज्यात मिळालेले अपयश आणि राष्ट्रवादीच्या उमेदवांराचा झालेला पराभव यावर बैठकीत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीला मिळालेले यश यामुळे अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता अशी चर्चा आहे. शरद पवार गटाकडून काही आमदारांना सातत्याने बोलले जात आहे. अनेक आमदार संपर्कांत किंवा आमदार परत येऊ शकतात असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. महायुतीला मिळालेले अपयश यामुळे आमदारांना एकसंध ठेवणे अजित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes