Maha Hit 24
Register

जाहिरात

 

महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्काराने मान्यवर भारावले

schedule09 Mar 24 person by visibility 95 categoryरणरागिणी पुरस्कार

कोल्हापूर : मराठ मोळ्या लावणीचा ठेका, प्रेक्षकांची भरभरुन साद, आकर्षक रांगोळी, सजलेलं सभागृह अशा जल्लोषी वातावरणात महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्कार २०२४ चे थाटामाटात वितरण झाले. 

खासदार धनंजय महाडिक, अप्पर जिल्हाधिकारी रघुनंदन सावंत यांच्या हस्ते उद्योजक उत्तम जाधव, अश्विनी तावरे, रजनीगंधा वंदुरे, वैशाली महाडिक, शामल पाटील-मोकाशी, विजयमाला फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका संकपाळ-साळोखे, विनायक पाटील, विष्णू कांबळे, महादेव पाटील, शदर नारकर, बाजीराव नाईक, श्वेता पाटील, प्रीती रेवणकर, राजेश्वरी मोटे यांचेसह इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. 

शिवराज्य ग्रुप महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष परेश भोसले, उपाध्यक्ष रावसाहेब वंदुरे, कार्याध्यक्ष भारत तोडकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तुषार पाटील यांनी कोल्हापूर-आंबेवाडी येथील दत्त समर्थ सांस्कृतीक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डोळ्याचे पारणे फेडणारा दिमाखदार सोहळ्यामध्ये महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने पुरस्कार प्राप्त मान्यवरांसह त्यांचे नातेवाईक भारावून गेले.

महागौरव सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य परशराम तावरे, राष्ट्रीय प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. अजित देसाई, समर्थ फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमोल भास्कर, शिक्षक दीपक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

शिवराज्य ग्रुप महाराष्ट्र यांचे वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र भूषण जीवनगौरव महासोहळा आयोजित केला होता. सुरुवातीस कोल्हापूरची लावणी क्विन मनाली मंडलीक हिचा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम पार पडला. 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes