Maha Hit 24
Register

जाहिरात

 

आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांचा विषय तापला

schedule11 Jul 24 person by visibility 116 categoryनोकरी

मुंबई : पूजा खेडकर IAS कशा झाल्या त्यावरुन वाद आहे. आता बेहिशोबी मालमत्ता, आरक्षणावरुन त्यांच्यावर आरोप झाले आहेत. आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर कोण आहेत? याची चर्चा आता राज्यात सुरु झाली आहे. मूळात त्या IAS कशा झाल्या त्यावरुन वाद आहे. 

आता हळूहळू त्यांच्या नियुक्तीवरुन राजकारण रंगायला लागलं आहे. आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पूजा खेडकर यांच्यावर आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे त्यांच्या समाजातील गरजूवर अन्याय झाला आहे असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. “पूजा खेडकर यांचे वडील, आजोबा सशक्त आहेत, तुम्ही सरकारी नोकरीमध्ये ऑडी सारखी गाडी घेऊन जाता. यामुळे हे सिद्ध होतं की, तुम्ही आरक्षणाचा गैरफायदा घेत आहात आणि सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो” असं आनंद दवे यांनी म्हटलय.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes