Maha Hit 24
Register

जाहिरात

 

चोरी - दरोड्याच्या घटनेत चोरटे तात्काळ जेरबंद

schedule27 Sep 24 person by visibility 66 categoryगुन्हे

गगनबावडा, 27 सप्टेंबर 2024 - ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने गगनबावडा पोलीस स्टेशनच्या वतीने आज प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामस्थांना चोरी-दरोड्याच्या घटनांवर तात्काळ प्रतिबंध करण्यासाठी आणि सरकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी यंत्रणेचा उपयोग कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डि.के. गोर्डे-पाटील यांनी उपस्थितांना यंत्रणेच्या कार्यपद्धतींचा सखोल परिचय दिला. यामुळे ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळवता येईल आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देणे सुलभ होईल.ग्राम सुरक्षा यंत्रणा आपत्कालीन व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे यावेळी वक्तव्य करणारे सहाय्यक गट विकास अधिकारी रुपेश टोणपे यांनी स्पष्ट केले. यंत्रणेमुळे प्रत्येक योजनेची माहिती गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे शक्य होईल, असे बांधकाम अभियंता बाजीराव मिसाळ यांनी सांगितले.

गगनबावडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी या यंत्रणेच्या उपयोगाने नागरिकांना गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत होईल, असे सांगितलेग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे संकट काळात नागरिकांनी 18002703600 किंवा 9822112281 या टोल फ्री नंबरवर कॉल करून मदत मिळवू शकतात. कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना तत्काळ ऐकू येईल, ज्यामुळे त्वरित प्रतिसाद मिळणे शक्य होईल.

या यंत्रणेच्या कार्यान्वयनासाठी प्रति कुटुंब 50 रुपये प्रतिवर्षाचा खर्च येईल, ज्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमात ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, व अन्य सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणा गेल्या 14 वर्षांत पुणे, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत असून, यामध्ये 6500 हून अधिक गावे सहभागी झाली आहेत.या यंत्रणेमुळे संपूर्ण भारतातील नागरिकांना एकत्रितपणे सुरक्षितता आणि मदतीचा अनुभव मिळवता येईल.


ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट

घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.

गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरीक/ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे.

अफवांना आळा घालणे.

प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.

पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये

संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा

गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत

संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600/9822112281

यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.

संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.

दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.

नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात

नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.

एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.

वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.

घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही,तोपर्यंत रिंग वाजते.

संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.

चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.

गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.

सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य. 

 महादेव कांबळे.


जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes