ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अझहा दरम्यान या गोष्टीवर बंदी
schedule22 Jun 24 person by visibility 89 categoryआंतरराष्ट्रीय
मुंबई : ताजिकिस्तानच्या संसदेच्या वरच्या सभागृह मजलिसी मिलीने 19 जून रोजी विधेयक मंजूर केले. ज्यामध्ये ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अझहा दरम्यान मुलांच्या परदेशी पोशाखावर बंदी घालण्याची तरतूद आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह मजलिसी नमोयांदगोन यांनी 8 मे रोजीच विधेयक मंजूर केले होते आणि बुरखा आणि हिजाब यांसारखे विदेशी कपडे घालण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली होती.
विधेयकावरील चर्चेदरम्यान, ताजिकिस्तानच्या संसदेने सांगितले की, महिलांचे चेहरे झाकणारा बुरखा हा ताजिक परंपरा किंवा संस्कृतीचा भाग नाही. त्यामुळे या विदेशी पोशाखांवर बंदी घातली आहे. अध्यक्ष रुस्तम इमोमाली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदेच्या 18 व्या अधिवेशनात सांस्कृतिक पद्धती, मुलांचे संगोपन करताना शिक्षकांची भूमिका आणि पालकांची कर्तव्ये यांच्याशी संबंधित कायदेही बदलले.
या नवीन नियमांचे कोणी उल्लंघन केले तर त्यांना मोठा दंड ठोठावण्याची तरतूदही कायद्यात करण्यात आली आहे. विधेयकातील तरतुदींनुसार, व्यक्तींना 7,920 सोमोनीपर्यंत दंड होऊ शकतो, तर कंपन्यांना 39,500 सोमोनीपर्यंत दंड होऊ शकतो. अधिकाऱ्यांना 54,000 आणि धार्मिक नेत्यांना 57,600 सोमोनी दंडाचा सामना करावा लागेल.